घर Pimpri-Chinchwad  सावित्रीबाई  फुले पुणे  विद्यापीठाची  पीएच. डी. पदवी अभिषेक कुलकर्णी  यांना जाहीर.

 सावित्रीबाई  फुले पुणे  विद्यापीठाची  पीएच. डी. पदवी अभिषेक कुलकर्णी  यांना जाहीर.

55
0

पिंपरी : दिनांक  ०३ सप्टेंबर  २०२३: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य  व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विषयात अभिषेक विश्वेश  कुलकर्णी यांना  पीएचडी जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय  ‘अ स्टडी ऑन द रोल  ऑफ  अप्रेंटिसशिप फॉर स्किल  डेव्हलपमेंट  इन  मॅनुफॅक्चरिंग  सेक्टर’  (A Study on the Role of Apprenticeship for Skill Development in Manufacturing Sector) हा होता.

सावित्रीबाई  फुले पुणे  विद्यापीठाचे  पीएच.डी संशोधन केंद्र  असलेल्या  एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या डॉ.कीर्ती धारवाडकर यांचे मार्गदर्शन  त्यांना लाभले. स्किल  डेव्हलपमेंट  क्षेत्रातील  देशातील  अग्रगण्य संस्था असलेल्या  यशस्वी संस्थेचे व्यवस्थापकीय  संचालक  म्हणून  अभिषेक  कुलकर्णी सध्या  कार्यरत  आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अभिषेक  कुलकर्णी यांच्या  या यशाबद्दल  सामाजिक,शैक्षणिक अशा  सर्व  स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा