घर Pimpri-Chinchwad शिक्षक दिन विशेष – साडे सातशे हून अधिक अधिकारी घडविणारे प्रा.भूषण ओझर्डे

शिक्षक दिन विशेष – साडे सातशे हून अधिक अधिकारी घडविणारे प्रा.भूषण ओझर्डे

465
0

५ सप्टेंबर – प्रा.भूषण ओझर्डे यांना मातीची भांडी घडविण्याप्रमाणे विद्यार्थी घडविण्याचे बाळकडू लहानपणापासूनच भेटले होते.

भूषण ओझर्डे यांचे वडील हे एक शिक्षणप्रसारक होते. त्यांनी आयुर्वेद मध्ये प्रचंड संशोधन करून व्यसनाधीनते वरती औषध शोधून त्याचे पेटंट घेतले होते. त्यांनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी आपल्या गावी शिक्षणसंस्था स्थापन केली व मुख्याध्यापक बनले. त्यानंतर ते पिंपरी चिंचवड येथे स्थलांतरीत झाले. त्यावेळी म्हाळसाकांत शाळा खंडोबाच्या मंदिरात भरायची तेव्हा ते तेथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झाले होते. भूषण ओझर्डे यांच्या आई म्हाळसाकांत विद्यालय शिक्षिका होत्या. त्या पुणे जिल्ह्याच्या अनेक खेडे गावच्या शाळेतही शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या आई वडिलांनी केलेले शैक्षणिक कार्य समस्त शिक्षक बांधवांना आणि समाजाला प्रेरक ठरत आहे.

भूषण ओझर्डे हे उच्च शिक्षित असून अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. भूषण ओझर्डे यांचे शिक्षण एमएससी, इलेक्ट्रॉनिक्स हे फर्ग्यूसन कॉलेज मधून झाले. त्यांनी एमए, इकनॉमिक्स पुणे विद्यापीठातून केले.

डी.वाय.पाटील बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज वरती प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्य इंटेलिजेंस अकॅडेमी वरती विझिटिंग लेक्चरर म्हणून कार्यरत होते.

त्यांना स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावे असे वाटू लागले आणि ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय, राज्यसेवा क्लासवन, स्टाफ सिलेक्शन कमिशन व इतर सोळा परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु त्यांना सतत पिंपरी चिंचवड मधील स्पर्धा परीक्षा केंद्राची उणीव जाणवत होती. त्यावेळी त्यांनी 1999 साली पिंपरी चिंचवड येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले.

छोट्याश्या टेरेस वरती विद्यार्थी शिकण्यासाठी येथील का? विद्यार्थी सतरंजीवर बसतील का? अशा अनेक समस्या प्र्थमत: होत्या. परंतु सुरूवात चार विद्यार्थांपासून झाली. त्यामधील दोन विद्यार्थी प्रथम वर्षीच अधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. प्रत्येक वर्षी अनेक विद्यार्थी अधिकारी घडविले.

आजपर्यंत त्यांनी साडे सातशे हून अधिक घडविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जवळ जवळ सर्वच पोस्टचे अधिकारी आहेत. तसेच इतरही अनेक परिक्षामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनेकांचे  राज्यात प्रथम, द्वितीय, तृतीत असे क्रमांक आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा