घर Sports रोहित शर्माबरोबर सलामीला शुभमन गिल उतरणार की ईशान किशन?

रोहित शर्माबरोबर सलामीला शुभमन गिल उतरणार की ईशान किशन?

49
0

मुंबई: प्रतिनिधी

आशिया करंडक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याची उत्कंठा क्रीडा रसिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. या महत्त्वाच्या सामन्याची तयारी भारतीय संघ मोठ्या उत्साहाने करत आहे. मात्र, के एल राहुल दुखापतग्रस्त असल्याने आणि रोहित शर्मा पुन्हा परतल्याने त्याच्याबरोबर डावाची सुरुवात शुभमन गिल करणार की ईशान किशन हा पेच भारतीय संघासमोर आहे.

राहुल दुखापतग्रस्त असल्याने स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा खेळात परतला आहे. त्यामुळे गावाची सुरुवात रोहित करणार हे निश्चित आहे. मात्र त्याच्याबरोबर सलामीला शुभमंग येणार की ईशान यावर खल सुरू आहे.

वेस्टइंडीज संघाबरोबर झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा याने विश्रांती घेतल्यामुळे ईशानला शुभमंग बरोबर गावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्याने 61.33 च्या सरासरीने दहावा जमवून या संधीचे सोने केले. या मालिकेत त्याने तीन अर्धशतकांसह 184 धावा करून आपल्या खेळाची चुणूक दाखवली. मागील वर्षी बांगलादेश संघाबरोबर खेळताना सलामीचा फलंदाज म्हणून मैदानावर उतरलेल्या ईशान्य द्विशतकही झळकावले आहे.

या पार्श्वभूमीवर रोहित बरोबर ईशानला सलामीला पाठवावे, असा माझी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आग्रह आहे. ईशानला सलामीला खेळवले तर आपल्या बेधडक फलंदाजीने तो डावाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मजबूत अवस्थेत नेऊन ठेवू शकतो, असा विश्वास शास्त्री यांना आहे.

सलामीच्या जोडीत ईशान चा समावेश झाल्यास शुभम तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येईल. दुखापतीतून सावरलेला श्रेयस अय्यर पाचवा आणि हार्दिक पंड्या सहावा फलंदाज असेल. अर्थातच अशावेळी सूर्यकुमार यादव यांच्यासाठी संघात स्थान उरणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा