घर Politics पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी: सायरस पूनावाला

पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी: सायरस पूनावाला

36
0

पुणे: प्रतिनिधी

शरद पवार हे चाणाक्ष राजकारणी असून ते देशाची मोठी सेवा करू शकले असते. मात्र, आता त्यांचे वय झाले आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्ला सिरम इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष आणि पवार यांचे जवळचे मित्र सायरस पूनावाला यांनी दिला आहे. पवार यांना दोन वेळा पंतप्रधान पद हस्तगत करण्याची संधी होती. मात्र, त्यांनी ती गमावली, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पूनावाला यांनी पत्रकारांशी संवाद साधून चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. या दरम्यान प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीने पूनावाला यांना शरद पवार यांच्या विषयी प्रश्न विचारला असता काही क्षण ते बुचकळ्यात पडले. हा तर राजकीय प्रश्न झाला, अशी प्रतिक्रिया देतानाच पवार यांच्या विषयी त्यांनी आपले मत मोकळेपणाने व्यक्त केले.

शरद पवार हे हुशार व्यक्ती आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. राजकारणाच्या माध्यमातून ते देशाची आणखीही अधिक सेवा करू शकले असते. मात्र, आता ते वृद्ध झाले आहेत. राजकारणात सहा दशकांचा कालावधी कार्यरत राहणे ही सोपी गोष्ट नाही. पवार यांनी ती साध्य करून दाखवली आहे. आता मात्र त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असा सल्ला पूनावाला यांनी दिला.

शरद पवार यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दोन वेळा पंतप्रधानपद मिळविण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र, त्यांनी ती गमावली, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट बरोबर घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे असा सल्ला दिला होता. मात्र पवार यांनी हा सल्ला फेटाळून लावताना माजी पंतप्रधान मोरारजी भाई देसाई यांचे उदाहरण दिले होते. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेचाही दाखला दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा