घर Politics चीनच्या अतिक्रमणाबाबत स्पष्टीकरण द्या: राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

चीनच्या अतिक्रमणाबाबत स्पष्टीकरण द्या: राहुल गांधी यांची पंतप्रधानांकडे मागणी

49
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांचा चीनमध्ये समावेश करणाऱ्या चीनच्या नव्या नकाशा बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी काँग्रेसने ते राहुल गांधी यांनी केली. भारताची एक इंच जमीनही चीनने घेतलेली नाही हा पंतप्रधानांचा दावा खोटेपणाचा आहे, या आरोपाचा पुनर उपचार करत गांधी म्हणाले की, चीनने भारतीय भूमी वेळणखृत केली आहे याची जाणीव लदाखच्या नागरिकांना आहे.

चीनने सन 1962 मध्ये भारतावर केलेल्या आक्रमणाच्या वेळी गिळंकृत केलेला अक्साई चीन तिबेटचा भूभाग असल्याचा दावा करत अरुणाचल प्रदेश हे भूभाग चीनने आपल्या नव्या नकाशात समाविष्ट केले आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून स्वतः पंतप्रधान मोदी यांनी याबाबत निवेदन करावे, अशी मागणी गांधी यांनी केली आहे. त्यांनी नुकताच लदाखचा दौरा केला असून चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केले आहे याची जाणीव लद्दाखच्या नागरिकांना आहे असा त्यांचा दावा आहे.

केवळ उलटे सुलटे दावे करण्यामुळे इतर देशांचे भूभाग आपल्याला मिळत नसतात, अशा शब्दात भारतीय भूमी आपल्या नकाशात समाविष्ट करण्याच्या चीनच्या कृत्याची परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खिल्ली उडवली आहे. असे प्रकार करण्याची चीनची जुनी खोड आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय भूभाग आपल्या नकाशात समाविष्ट करण्याचे चीनच्या कृत्याचा भारत आणि निषेध केला आहे. चीनच्या अशा कृत्यांमुळे भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नांना बाधा येत आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा