घर Pune ‘आम्ही पुणेकर’च्या वतीने सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधन

‘आम्ही पुणेकर’च्या वतीने सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधन

55
0

पुणे: प्रतिनिधी

आम्ही पुणेकर या संस्थेच्यावतीने जम्मू आणि कश्मिरमधील सैनिकांकरीता दिव्यांगांनी बनवलेल्या राख्या आणि चॉकलेट राख्या जवानांना बांधण्यात आल्या. यावेळी आम्ही पुणेकरचे हेमंत जाधव, योगेश पवार, बाळासाहेब बांगर उपस्थित होते.

यावेळी बोलताना इंडियन आर्मी चे अधिकारी म्हणाले, यावेळी असे वाटत नाही की आम्ही बॉर्डर वर आहोत. इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व जणांनी उपस्थिती लावली आणि खूप प्रेम दिले.

हेमंत जाधव म्हणाले, जम्मू-काश्मीर मधील सांबा सेक्टर, डोडा, कुपवाडा,रियासी सह विविध भागांतील सैनिकांना या राख्या बांधल्या.नेहमीच्या राख्यांपेक्षा चॉकलेटच्या राख्या जवानांसाठी तयार करण्यात आल्या होत्या.या उपक्रमांकरिता अनेक संस्थांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा