घर Pune आयएमइडी जेम्स २०२३ स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन

आयएमइडी जेम्स २०२३ स्पर्धा महोत्सवाचे उद्घाटन

43
0

पुणे : प्रतिनिधी

भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’(आयएमईडी) मध्ये ‘आयएमईडी जेम्स्-२०२३’  या  विद्यार्थ्यांसाठीच्या दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा महोत्सवाचे उदघाटन लाईफ स्किल ट्रेनर अंजनी कुमार शुक्ल  यांच्या हस्ते  २५ ऑगस्ट  रोजी सकाळी  झाले.या स्पर्धा महोत्सवात ११ स्पर्धांचा समावेश असून  आयएमईडी चे विद्यार्थी सहभागी झाले  आहेत. या स्पर्धा महोत्सवामध्ये ‘ऍप चॅलेंज’, ‘वक्तृत्व स्पर्धा’, ‘डेव्हलपिंग वेबसाईट’, ‘टेक्नो इव्हेंट’,क्रिएटिव्हिटी , ‘माझे चित्र ,माझी गोष्ट’, ‘रांगोळी’, ‘फेल्मलेस कुकिंग’, ‘सर्वात्तम उद्योजक’, प्रश्नमंजूषा अशा  स्पर्धांचा समावेश आहे.२६ ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. हा  स्पर्धा महोत्सव  आयएमईडी ( पौड रस्ता  कॅम्पस, कोथरुड ) येथे होत  आहे. महोत्सवातील सर्व विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.

उदघाटन प्रसंगी बोलताना भारती विद्यापीठ आयएमइडी चे प्रभारी संचालक डॉ अजित मोरे म्हणाले,’ भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांच्या  प्रेरणेने , कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ .विश्वजीत कदम , कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या  मार्गदर्शनाखाली अशा स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले ‘.उपप्राचार्य डॉ.आर.व्ही .महाडिक हे या स्पर्धा महोत्सवाचे समन्वयक आहेत.’आयएमईडी हे  एक कटुंब  आहे; इथे स्पर्धामधून विद्यार्थ्यांनी  चांगली कौशल्ये आत्मसात करावीत’, असे उद्गार उद्घाटन प्रसंगी त्यांनी काढले. आयएमईडीच्या पदवीपूर्व विभागाचे संचालक डॉ .महेश शितोळे यांचेही मार्गदर्शन लाभले. प्राध्यापक वर्गाचाही आयोजनामधे सहभाग आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा