घर Pimpri-Chinchwad डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीतरत्न पुरस्कार प्रदान

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीतरत्न पुरस्कार प्रदान

52
0

 

पिंपरी, विश्व सह्याद्री न्यूज : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या वतीने पं.विष्णु दिगंबर पलुसकर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कलाक्षेत्रातील नामवंत कलाकारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नृत्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय किर्तीचे प्रसिद्ध कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर यांना पं. विष्णु दिगंबर पलुसकर संगीत रत्न पुरस्कार देऊन अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी वाशी, मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. या वेळी रंगमंचावर पद्मश्री डाॅ.पुरू दाधीच, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुर्यवंशी, सचिव सुधाकर चव्हाण, रजिस्ट्रार विश्वास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण भारतातून नृत्य क्षेत्रातील केवळ सात नृत्य कलाकारांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या मधे पुणे जिल्ह्यातून केवळ एकमेव कथक नर्तक डाॅ.पं.नंदकिशोर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हे विशेष.

डाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांना या आधी नुकताच भारत सरकार चा संगीत नाटक अकादमी हा कलाक्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मिळाला आहे. डाॅ.पं.नंदकिशोर हे डाॅ.डी.वाय.पाटील विद्यापीठ लिबरल आर्ट्स येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा