घर Pimpri-Chinchwad पोहायला गेलेले बापलेक धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडाले

पोहायला गेलेले बापलेक धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडाले

85
0

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये ( Pune) बुडून बाप लेकीचा दुःखद मृत्यू झाला. 15 ऑगस्टच्या दिवशी ही घटना घडली. भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी पुण्यातील औंध येथून धर्माधिकारी कुटुंब पर्यटनासाठी आले होते. वडील आणि मुलगी भाटघर धरणाच्या बॅक वॉटर मध्ये उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला.

शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय 45) आणि ऐश्वर्या मनोहर धर्माधिकारी (13) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या बाप लेकीची नावे आहेत. पुण्यातील औंध परिसरातून ते पर्यटनासाठी आले होते.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धर्माधिकारी कुटुंबीय हे 15 ऑगस्ट निमित्ताने जयतपाड या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ते भाटकर धरणाच्या बॅक वॉटर पाहण्यासाठी गेले होते. यावेळी शिरीष धर्माधिकारी हे खोल पाण्यात उतरले.
त्यांनी मुलगी ऐश्वर्या तिला देखील बोलावून घेतले. त्यानंतर पाण्यात पोहत असताना अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. दरम्यान आरडाओरडा झाल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेत ऐश्वर्याला बाहेर काढले.
तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिरीष धर्माधिकारी यांचा मृतदेह ( Pune) सापडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा