घर India पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

67
0

वादविवादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची उपस्थिती

पुणे: प्रतिनिधी

मोठा वादाचा विषय ठरल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकमान्य टिळक यांची खास ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, एक लाख रुपये रोख आणि दैनिक केसरीचा प्रथम अंक हे पुरस्काराचे स्वरूप होते. मोदी यांच्या सूचनेप्रमाणे पुरस्काराची रोख रक्कम “नमो गंगे’ या गंगा शुद्धीकरण प्रकल्पाला प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टिळक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक, विश्वस्त आणि काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीत प्रवेश केला आहे. या पक्ष फुटीला भारतीय जनता पक्षाला जबाबदार धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि मोदी हटाव या एकमेव उद्देशाने विरोधकांची एकजूट करून स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते शरद पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे आवाहन विरोधकांकडून करण्यात आले होते. मात्र, पवार यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात येऊ नये. मोदी हे लोकशाहीची चाड न ठेवणारे नेते आहेत. त्यांच्या काळात देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. समाजा समाजातील तेढ वाढीस लागत आहे, असे आरोप करीत काँग्रेस सह इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली युक्रांद, डॉ बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली हमालपंचायत अशा अनेक संस्था संघटनांनी मोदी यांच्या विरोधात निदर्शने केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा