घर Uncategorized आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवा: डॉ. नीलम गोऱ्हे

आळंदीचा विकास आराखडा तयार करताना भाविकांना केंद्रस्थानी ठेवा: डॉ. नीलम गोऱ्हे

31
0

‘शेगाव येथील श्री. गजानन महाराज संस्थांनचा पॅटर्न माऊलींच्या मंदिरात राबवला जावा’

पुणे: प्रतिनिधी

भाविकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध विकास आराखडा बनवावा अशी सूचना करतानाच देवस्थानच्या विकासाकरिता लागणाऱ्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सुरक्षा रक्षकांसह होमागार्ड्सची नेमणूक बारा महीने असली पाहिजे. शेगाव येथील श्री. गजानन महाराज संस्थांनचा पॅटर्न माऊलींच्या मंदिरात राबवला जावा असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री. क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी स्थळाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी मंदिर परिसरातील अजान वृक्ष, माऊलींचे कुलदैवत श्री. सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले. डॉ. गोऱ्हे यांनी ग्रंथ भांडाराला भेट देऊन माऊलींचे पुस्तक खरेदी केले. माऊलींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या परिसरात आल्यावर मानला समाधान वाटल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी आळंदी देवस्थानचे वतीने उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीकडून डॉ. गोऱ्हे यांनी मंदिराच्या विकासकामांची माहिती घेतली.

याप्रसंगी, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सतलज दिघे – गोऱ्हे, शिवसेना महिला पदाधिकारी मंगलाताई हुंडारे,  संगीता फफाळ, मंदिर समिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विशेष कार्यकारी अधिकारी  संकेत वाघमारे, माऊलीदास महाराज, शिवसेना उपजिल्हा प्रमुख  प्रकाश वाडेकर, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ सदस्य नितीन गोरे,  युवराज शिंगाडे, राहुल चव्हाण, उपसभापती यांचे विशेष कार्यकारी अधिकारी किरण काकडे,  अविनाश राळे, सचिन शिंदे,  अर्जुन मेदनकर, साईनाथ ताम्हणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा