घर Politics विरोधकांच्या बैठकीदरम्यान भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआचे शक्तिप्रदर्शन

विरोधकांच्या बैठकीदरम्यान भाजपच्या नेतृत्वाखाली रालोआचे शक्तिप्रदर्शन

73
0

 

नवी दिल्ली: प्रतिनिधी

सर्वांच्या साथीने देशाचा विकास हे भारतीय जनता पक्षाचे उद्दिष्ट आहे. राजकीय आघाडी उभारण्यासाठी आम्ही कोणालाही बोलवायला जात नाही. आम्ही आपले धोरण जाहीर करतो आणि ते मान्य असलेले पक्ष आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येतात, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यांनी भाजपसोबत आघाडीत असलेल्या ३६ पक्षांची यादीही जाहीर केली.

भाजपच्या विरोधात असलेल्या पक्षांची आघाडी उभारण्याच्या दृष्टीने दुसरी बैठक बंगळुरू येथे होत आहे. संभाव्य आघाडीचे नाव आणि ध्येयधोरणे निश्चित करण्याचे काम या बैठकीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. विरोधकांच्या पाटणा येथे पार पडलेल्या पहिल्या बैठकीला काँग्रेस सह 16 पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दुसऱ्या बैठकीला २८ नवीन पक्ष आघाडीत सहभागी होतील असा दावा केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आपल्या ३८ सहकारी पक्षांची यादी जाहीर केली आहे. भाजपनेही आज संध्याकाळी आपल्या सहयोगी पक्षांची बैठक दिल्ली येथे आयोजित केली आहे.

व्यक्तिगत स्वार्थावर आधारलेली आणि कोणताही विचार अथवा धोरण नसलेली विरोधकांची आघाडी असून या गाडी निवडणुकीत आपला प्रभाव पाडू शकणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा दावा नड्डा यांनी केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार १० वर्ष  सत्तेत असताना त्या सरकारचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचार याचे फलित म्हणून संपुआ निष्प्रभ ठरली आहे. त्या काळात घडलेल्या तब्बल वीस लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाऊ नये, यासाठीच विरोधक एकत्र आल्याची टीका देखील त्यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा