घर Politics पक्षफुटीला पवारांचे निकटवर्तीय जबाबदार: छगन भुजबळ यांचा दावा

पक्षफुटीला पवारांचे निकटवर्तीय जबाबदार: छगन भुजबळ यांचा दावा

69
0

नाशिक: प्रतिनिधी

येवला येथे घेतलेल्या सभेबद्दल आश्चर्य व्यक्त करत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीला मी जबाबदार नाही तर पवार परिवार आणि त्यांचे निकटवर्तीय जबाबदार आहेत, असा दावाही त्यांनी केला.

पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी येवला येथे जाहीर सभा घेऊन भुजबळ यांच्यावर टीकेची झोड उठवली. ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्याची टीका पवार यांनी केली. भुजबळ यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी येवल्याच्या मतदारांची माफीही मागितली.

शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले अजित पवार हे त्यांच्या परिवारातील आहेत. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे नेते आहेत. त्यांच्या आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जाहीर सभेला शरद पवार यांनी हजेरी लावली नाही, याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.

आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल येवल्याच्या मतदारांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. आपल्यामुळे येवल्याचा विकास झाला आहे, असा दावा करताना भुजबळ यांनी, नाशिकच्या लोकांचे शरद पवारांवर एवढे प्रेम असेल तर मागील २०१९ च्या निवडणुकांमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव का झाला, असा सवालही केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा