घर Politics अजित पवार पाडणार काँग्रेसलाही खिंडार?

अजित पवार पाडणार काँग्रेसलाही खिंडार?

66
0

मुंबई: प्रतिनिधी

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आता काँग्रेसलाही खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे अनेक आजी-माजी आमदार आणि खासदारही राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असून ते काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.

अजित पवार यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली आहे. त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री पद बहाल करण्यात आले असून त्यांच्या आठ सहकाऱ्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्याचे अजित पवार यांचे म्हणणे आहे.

याच विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. असे नेते खुद्द अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावा पाटील यांनी केला.

पाटील यांनी ठाकरे गटाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ज्यांना आपल्या पक्षात काय सुरू आहे याचा अंदाज येत नाही, पक्षातील आपल्याच सहकाऱ्यांचे आपल्याबद्दल काय मत आहे हे ज्यांना समजून घेता येत नाही, त्यांनी इतरांबाबत टीकाटिप्पणी करू नये, असे पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा