घर India लद्दाखमध्ये भारतीय लष्कराने केले शक्तिप्रदर्शन

लद्दाखमध्ये भारतीय लष्कराने केले शक्तिप्रदर्शन

76
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

भारतीय लष्कराने सीमेवर केलेल्या युद्धसरावादरम्यान आपल्या सामाजिक समर्थाचे प्रदर्शन घडवून आणले आहे. लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या युद्धसरावात रणगाडे, लढाऊ विमाने आणि बहुउपयोगी वाहनांचा वापर करण्यात आला. या सरावादरम्यान रणगाडे आणि लढाऊ विमानांनी सिंधू नदीचे पात्र पार केले.या युद्धसरावत  T 90, T 72, भीष्म हे रणगाडे,, धनुष तोफ आणि M 4 या बहुउपयोगी वाहनाने विशेष कामगिरी केली.

धनुष ही तोफ ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विकसित करण्यात आलेली पूर्णतः स्वदेशी बनावटीची तोफ आहे. जबलपूर येथील शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात या तोफेचे उत्पादन केले जाते. धनुषची तब्बल 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. समुद्रसपाटीपासून 4000 मीटर उंचीवर ही तोफ हल्ला करू शकते. या तोफेतून एकाचवेळी तीन राऊंड फायर होतात. ही तोफ बोफोर्सच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. बोफोर्स तोफांनी कारगिल युद्धात लक्षणीय कामगिरी बजावली होती.

M 4 हे बहुउपयोगी वाहन सन २०२२ मध्ये भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल करण्यात आले. या वाहनातून एकावेळी दहा जवान प्रवास करू शकतात. या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे तैनात करण्यात आलेल्या यंत्रणेमुळे एकाच वेळी आठ दिशांना आठ साधनातून स्फोटके दागता येतात.

अचानक उद्भवलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत शत्रूला तोंड देण्याच्या क्षमतेची परीक्षा घेणे हा या युद्धसरावाचा उद्देश आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध वर्षानुवर्ष ताणलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर लडाख सीमेवर भारतीय लष्कराने केलेले शक्तिप्रदर्शन उल्लेखनीय आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा