घर Pimpri-Chinchwad बकरी ईद निमित्त केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल व सहकार्याबद्दल स्मृती चिन्ह प्रदान...

बकरी ईद निमित्त केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल व सहकार्याबद्दल स्मृती चिन्ह प्रदान करून आभार

64
0
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र अशा बकरी ईद निमित्त कुर्बानी करिता केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल व सहकार्याबद्दल पिंपरी चिंचवड़ महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह सर, तसेच अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ साहेब यांना कुरेशी फाउंडेशन व पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद आणि पिंपरी चिंचवडच्या समस्त मुस्लिम बांधवांतर्फे स्मृती चिन्ह प्रदान करून आभार मानण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या शिस्ट मंडळाच्या सदस्यांनी आयुक्त साहेबांना पालिकेचा कायमस्वरूपी कत्तलखाना करून  हा प्रश्न कायमचा मिटवावा अशी मागणी केली.
यावेळी. हाजी अकील मुजावर, व राष्ट्रीय अध्यक्ष. ॲड फहीम कुरेशी(AIJQAC), यांच्या मार्गदर्शनात कुरेशी फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड मुस्लिम विकास परिषद या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कुरेशी जमातचे अध्यक्ष. हाजी वाहिद कुरेशी, ज्येष्ठ नेते.हाजी रौफ कुरेशी, गुलाम मोहम्मद शेख, शफीउल्ला काझी, फय्याज कुरेशी, हाजी दस्तगीर मनियार, अजहर खान, जाफर मुल्ला,नादीर बेग, इमरान बिजापूरे, नियाज देसाई, AIMIM महीला अध्यक्ष रुहीनाज शेख,  कुरेशी फाउंडेशनचे अध्यक्ष इरशाद कुरेशी, कार्याध्यक्ष. मुबिन कुरेशी, उपाध्यक्ष असिफ कुरेशी,आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा