घर Pimpri-Chinchwad शहरातील स्वच्छतागृहांची माहिती मोबाईल अॅपवर मिळवण्यासाठी टॉयलेटसेवा अॅपचा लोकार्पण

शहरातील स्वच्छतागृहांची माहिती मोबाईल अॅपवर मिळवण्यासाठी टॉयलेटसेवा अॅपचा लोकार्पण

51
0

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने  शहरातील स्वच्छतागृहांची माहिती मोबाईल अॅपवर मिळवण्यासाठी टॉयलेटसेवा अॅपचा लोकार्पण सोहळा आज पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ तसेच टॉयलेटसेवा अॅप विकसित करणारे अमोल भिंगे, प्रितम चोपडा, सोनाली चोपडा, तसेच आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडीत, किरण मोरे, शितल वाकडे, स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयक सोनम देशमुख जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदि उपस्थित होते.

पिंपरी  चिंचवड शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होण्या करिता  पिंपरी  चिंचवड महापालिका आणि  माहिती  तंत्रज्ञान  क्षेत्रातील  तज्ञ अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले टॉयलेटसेवा अॅप तयार केले आहे. या अॅप द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, डस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स इ  सुविधा बाबत  फीडबॅक देणे , टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत.

पिंपरी  चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अॅप चा वापर करून आपला सहभाग नोंदवावा असे जाहीर आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा