घर Politics ऐंशी टक्के आमदार परत येतील: राष्ट्रवादीच्या निष्ठावान नेत्यांचा विश्वास

ऐंशी टक्के आमदार परत येतील: राष्ट्रवादीच्या निष्ठावान नेत्यांचा विश्वास

76
0

मुंबई: प्रतिनिधी

अजित पवार यांच्याबरोबर जाऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेशी हात मिळवणी केलेल्या आमदारांपैकी तब्बल 80 टक्के आमदार पक्षात परत येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावान नेत्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम करणाऱ्या राजकारणातील दुष्पवृत्तींना जनताच धडा शिकवेल, असे मत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

पक्षातील काही ज्येष्ठ नेते आणि आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरीही पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवार यांच्याच बरोबर आहेत. भाजप शिवसेना युती सरकारबरोबर जाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वारस्य नाही. अजित पवार आणि इतर नऊ मंत्र्यांचे शपथविधी राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही. भाजपच्या ऑपरेशन लोटस चा तो एक भाग आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सक्षमपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा