घर Pune City सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णसेवेसाठी कार्यान्वित

सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णसेवेसाठी कार्यान्वित

122
0

पुणे: प्रतिनिधी

सुदर्शन कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ही संस्था कर्करोगावरील उपचार आणि त्याबाबत जनजागृती हे उद्दिष्ट ठेवून रुग्णसेवेसाठी कार्यान्वित झाली आहे.

प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजीनगर भागाचे संघचालक अनिल व्यास, कर्करोग तज्ञ डॉ. अनंत भूषण रानडे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व ग्राहक पेठेचे अध्यक्ष एस आर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संस्थेचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर सहकार्यवाह महेश पोहनेरकर उपस्थित होते.

सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याबरोबरच समाजात कर्करोगाविषयी जनजागृती करणे हे संस्थेचे ध्येय आहे, असे सांगून डॉ. रानडे यांनी कर्करोग या विकाराची व्याप्ती व त्याने समाजाला घातलेला विळखा याविषयी माहिती दिली. तसेच त्यासाठी ‘सुदर्शन’सारख्या संस्थांची का गरज आहे, याविषयी प्रबोधन केले.

कर्करुग्णांसाठी तब्बल ४० डॉक्टरांची टीम रुग्णसेवेत सहभागी आहे,अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

पोहनेरकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये संघ विचारांनी प्रेरित होऊन समाजामध्ये संघ स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी धनंजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले तसेच योगेश देशपांडे यांनी संस्थेच्या संकल्पना व उद्देश याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाला समाजामधील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व इतर सेवाभावी संस्थाचे प्रमुख उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा