घर Politics शोषित, वंचित आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा: मोदी यांनी मंत्र्यांना दिला निवडणूक...

शोषित, वंचित आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करा: मोदी यांनी मंत्र्यांना दिला निवडणूक मंत्र

89
0

नवी दिल्ली: प्रतिनिधी

यावर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणारी सार्वत्रिक निवडणूक नजरेसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना निवडणूक मंत्र दिला आहे. त्यानुसार आगामी काळात शोषित, वंचित आणि मध्यमवर्गा वर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिले आहेत.

आगामी काळात मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तसेच आगामी वर्षाच्या सुरुवातीला सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या.

येणाऱ्या काळात समाजातील शोषित वंचित घटक आणि मध्यमवर्गाला केंद्रभूत म्हणून उपक्रम करा. आपल्या मंत्रालयांच्या माध्यमातून या वर्गांना थेट लाभ पोहोचेल अशा योजना कार्यान्वित करा. या समाज घटकांच्या भावना समजून घेण्यासाठी बैठका, मेळावे अशा उपक्रमांचे आयोजन करा, अशा सूचना मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.

पक्ष संघटनेच्या पातळीवरही आगामी निवडणुका लक्षात घेऊन नरेंद्र मोदी यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने मोदी यांनी नुकतीच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत माध्यमांना माहिती देण्यात आली नाही

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा