घर Uncategorized आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी रोटरीचा हेल्थीअर मी प्रकल्प

आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी रोटरीचा हेल्थीअर मी प्रकल्प

86
0

पुणे: प्रतिनिधी

मनुष्याच्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह,हृदय विकार,लठ्ठपणा अशा अनेक आजारांनी शरीरात घर केले आहे. व्यायामाद्वारे या आजारांना दूर ठेवणे शक्य आहे. परंतु एकेकट्याने व्यायाम होत नाही. यासाठी रोटरी क्लब लोकमान्य नगरने “हेल्दियर मी” या प्रकल्पाचे आयोजन केले आहे

या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांनी १० महिन्यात १२ आव्हाने (चॅलेंजेस) पूर्ण करायची आहेत. ती अतिशय सोपी आहेत. प्रतिदिन काही पावले चालणे, ठराविक संख्येने सूर्यनमस्कार, व्यायाम करणे, काही दिवसांसाठी वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये भाग घेणे, ट्रेकिंग, योगा व झुंबा नृत्य यात सहभागी होणे यांचा त्यामध्ये समावेश आहे.

यात सहभागी होणार्‍या व्यक्तींकडून घेतली जाणारी शुल्काची रक्कम गरजूंना मदत करण्यासाठी निधी उभा करण्यासाठी वापरली जाईल. १२ पैकी ९ आव्हाने पूर्ण करणार्‍या सहभागींना मे महिन्यात पदके देण्यात येतील. असे रोटरी क्लब अध्यक्ष २३-२४ मनोज आगरवाल व प्रकल्प प्रमुख राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क www.healthierme.in

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा