घर Pimpri-Chinchwad एस. बी. पाटील महाविद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा

एस. बी. पाटील महाविद्यालयात जागतिक योगदिन उत्साहात साजरा

98
0

पिंपरी, पुणे (दि. २२ जून २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील महाविद्यालयात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योगाचार्य
बबन राऊत यांनी योगदिनाचे महत्व, विविध आसने आणि प्राणायाम केल्याने होणारे फायदे याची माहिती प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना दिली. तसेच ताडासन, अनुलोम-विलोम, प्राणायाम, भ्रामरी, ओमकार इत्यादीचे प्रात्यक्षिके करून दाखविले. योगदिनाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच प्राचार्य संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व नियमित योगासने करण्याचे धडे दिले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा शिक्षक प्रदीप कासार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सर्व शिक्षक, कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहशिक्षक सुजाता सिलम यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा