घर Pimpri-Chinchwad ‘अस्खलित इंग्रजी’ चा नवा पॅटर्न तयार करणार्‍या प्रा.स्मिता सातारकर 

‘अस्खलित इंग्रजी’ चा नवा पॅटर्न तयार करणार्‍या प्रा.स्मिता सातारकर 

79
0

पुणे : जागतिकीकरणाच्या युगात उत्तम इंग्रजी बोलता येणे महत्त्वाचेच नव्हे तर अपरिहार्य बनले आहे. इंग्रजीतून उत्तम संभाषण करता येणं आणि इंग्रजी लेखनकौशल्यात पारंगत असणं आज करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.. तसे म्हटले तर आपण सगळेच इंग्रजी भाषेशी परिचित आहोत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजातही आपण इंग्रजी वापरतो. आपल्यापकी अनेकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांतून शिक्षणही घेतलेले असेल. तरीही आयत्या वेळी इंग्रजीत संभाषण किंवा प्रेझेंटेशन करायची वेळ आली तर आपण कचरतो. इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडता येतील का? चपखल शब्द सुचतील का? अशा शंका मनात डोकावतात. या भीतीवर मात करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करणे आवश्यक आहे.भाषिक अडचणीमुळे एखादी व्यक्ती अडखळत किंवा विचार करत बोलते. ऐकणाऱ्याचा असा समज होऊ शकतो की बोलणाऱ्या व्यक्तीला विषयाची आवश्यक तितकी माहिती नसल्यामुळे ती अडखळतेय. भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले, की आपल्या कार्यक्षमतेविषयीचे असे गरसमज टाळता येतात. मातृभाषेइतकेच सहज इंग्रजीतून बोलता आले पाहिजे. कोणतीही पूर्वतयारी किंवा जुळवाजुळव केल्याशिवाय उत्तम संभाषण करण्याएवढी भाषेवर पकड असायला हवी.

प्रा.स्मिता सातारकर यांनी 25 वर्षांचा प्रदीर्ध रिसर्च करत ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय संस्था मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान दिले आहे. त्यांच्या ‘फोनिक्स अकॅडेमी’ या संस्थेमधून आतापर्यंत सर्व वयोगटातील 1 लाख विध्यार्थांनी ज्ञान घेतले आहे.  ज्यामध्ये त्या स्पेलिंग बिल्डिंग, फ्लूयुन्सी, रीडिंग स्किल, इंग्लिश ग्रामर, क्रियाटिव्ह रायटिंग स्किल, स्पोकण इंग्लिश, पालक सेमिनार, टीचर ट्रेनिंग, गेस्ट लेक्चर ई. प्रोग्राम घेतात.

‘साऊंड ऑफ मॅजिक’ हा अस्खिलीत इंग्रजी चा नवा पॅटर्न प्रा.सातारकर यांनी तयार केला आहे. गतीमान शिस्त, समर्पण व निर्धार अशा आधारावर गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन नवीन पिढी घडविणार्‍या प्रा. स्मिता सातारकर! ऊतम शिक्षण त्याचबरोबर इनोव्हटिव्ह शैक्षणिक नवी दृष्टी त्यांच्याकडे आहे. त्यांचा विनम्र व हसतमुख चेहरा विद्यार्थांची उमेद वाढविणारा आहे. त्याचमुळे त्यांचे विद्यार्थी इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडत चपखल पणे बोलत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा