घर Uncategorized ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार

ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार

115
0

पुणे :कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे यांचा सत्कार विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.’मनीषा नृत्यालय परिवार’च्या वतीने आयोजित हा कार्यक्रम दि.२७ मे २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह(कोथरूड) येथे सायंकाळी साडे पाच वाजता झाला.

या कार्यक्रमात पं.मनीषा साठे यांनी ‘नृत्यार्पिता’ हे बहारदार एकल नृत्य सादरीकरण केले.त्यांना निखिल पाठक,राजीव तांबे,सुनील अवचट,वल्लरी आपटे यांनी साथसंगत केली. . पं.मनीषा साठे यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त या सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . अशोक वैशंपायन गुरुजी यांनीवेद मंत्रातून अभिष्ट चिंतन केले.

शांभवी दांडेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले. ‘ नृत्यार्पिता ‘ सादरीकरणातून पं.मनीषा साठे यांनी प्रारंभी शिववंदना,ताल, नायिका भेद, द्रूत त्रिताल तसेच ‘ मोहे मना लाग्यो छंद ‘ हे भजन सादर केले. या बहारदार सादरीकरणाला रसिकांनी टाळयांच्या कडकडाटात , तसेच उभे राहून दाद दिली.

त्रिताल नंतर मनीषाताईंनी त्यांना आवडणारा गणेश ताल बारा मात्रांमध्ये सादर केला. त्यांचे गुरू बाळासाहेब गोखले यांच्या बंदिशी देखील सादर केल्या. गोपी कृष्ण यांच्या पारंपारिक तत्कार वरील पारंपारिक रचना सादर करताना त्यांनी प्रभुत्व सादर केले, रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गिनतीला रसिकांनी वन्स मोअर दिला !वि

द्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पं.मनीषा साठे यांचा सत्कार करण्यात आला.पं. साठे यांच्या शिष्यांनी भेटवस्तू त्यांना प्रदान केली.विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या भाषणात पं.मनीषा साठे यांच्या ध्यास आणि समर्पित योगदानाचे कौतुक केले.पं.साठे यांनी या हुदय सत्काराला उत्तर दिले.शां

भवी दांडेकर,पूनम गांधी,शिल्पा दातार, तेजस्विनी साठे, वल्लरी आपटे या शिष्यांनी औक्षण केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मधुरा आफळे, निखिल फाटक यांनी पं. मनीषा साठे यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यातून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे, योगदानाचे आणि नृत्यशैलींचे अनेक पैलू उलगडले.

ख्यातनाम शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर -टीकेकर, ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे, ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर, योगेश गोगावले,अंकुश काकडे, पुनीत जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठात नृत्य सभागृह उभारणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनीषा साठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ते म्हणाले,’ फक्त नृत्यासाठी एक थिएटर असावे अशी सर्व नृत्य गुरूंची इच्छा होती, त्या प्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने चार एकर जागा दिली आहे. आणि लवकरच त्याचे काम सुरू होईल. तसेच सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे नृत्य महोत्सव सुरू व्हावा यासाठी ‘ नृत्य रोहिणी महोत्सव ‘ डिसेंबर २३ पासून सुरू होईल. नोव्हेंबर २३ पासून रोहिणी भाटे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. त्यांच्या नावाने हा महोत्सव सुरू होईल. ही मनीषा ताईंच्या वाढदिवासाची ही मोठी भेटच त्यांच्यासाठी आहे ‘.

मनीषाताईंच्या नृत्यातून ब्रहमानंदाची अनुभूती 

विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, ‘ मनीषाताईंचे नृत्य म्हणजे अद्भुत आविष्कार आहे. आणि हे संपूच नये असे वाटत होते. आज इथे जमलेल्या प्रत्येकाला त्यांच्या नृत्यातून ब्रम्हानंद अनुभवता आला. पं. गोपीकृष्ण यांची आठवण त्यांनी नृत्यातून करून दिली. ताईंचा ७० वा वाढदिवस साजरा होत आहे. पण आपलं नृत्य पाहताना वाटलं कलावंतांना वय नसते, तर कलेला वय असते. त्या एक व्यक्ती नसून एक संस्था आहात ‘.

सत्काराला उत्तर देताना पं.मनीषा साठे म्हणाल्या, ‘ या हृदय सोहळ्याने मी भारावून गेले आहे. गेली ६२ वर्ष मी नृत्याला दिली. मनीषा नृत्यालयाच्या नृत्य प्रशिक्षणाला ४८ वर्ष पूर्ण झाली.या मागे गुरू पं. गोपीकृष्ण, आई वडील , गुरू यांचे आशीर्वाद आहेत. रसिकांच्या सदिच्छा आहेत.

……. ……………………………………….
~ Media Co Ordination :

*Dr.Deepak Bidkar*,Gauri Bhave-Bidkar,

Prabodhan Madhyam(News Agency),Pune 9850583518

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा