घर Pimpri-Chinchwad पिंपरी-चिंचवड मध्ये हाय प्रोफायल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरी-चिंचवड मध्ये हाय प्रोफायल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

99
0

पिंपरी-चिंचवड येथील एका पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून पुणे पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आणि भोजपुरी चित्रपट अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनीच अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. पुणे पोलिसांना, पिंपरी-चिंचवड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानंतर सापळा रचून या रॅकेटचा पर्दाफाश केला. दरम्यान पोलिसांनी भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेलची सुटका केली. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु केला आहे. आरोपींनी पीडितांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत केले. ग्राहकांनी अधिक पैसे दिले होते, अशी माहिती तपास अधिकारी देवेन चव्हाण यांनी दिली आहे. प्रबीर मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी महिलांना मोठ्या रक्कमेचे आश्वासन देऊन वेश्या व्यवसायात अडकवले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा