घर Maharashtra Special गदिमा नाट्यगृहाचा पडदा अखेर १५ मे ला उघडणार!

गदिमा नाट्यगृहाचा पडदा अखेर १५ मे ला उघडणार!

156
0
नितिन येलमार(पिंपरी) – अखेर गदिमा नाट्यगृहाच्या (प्राधिकरण,पिंपरी चिंचवड) उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी १५ मे २०२३ रोजी दुपारी १२.१० मिनिटांनी नाट्यगृह रसिकांसाठी खुले होणार आहे. तसेच विविध विकास प्रकल्पांचे गदिमा नाट्यगृहातूनच ऑनलाईन पद्धतीने त्याच वेळी उद्घाटन होईल.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह (भा.प्र.से) यांनी सदरची माहिती दिलेली आहे.
यात मुख्य नाट्यगृह ८०० प्रेक्षक क्षमता,छोटे नाट्यगृह २२० प्रेक्षक क्षमता,कलादालन, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल,प्रशस्त दोन मजली पार्किंग,अग्निशामक यंत्रणा,अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी स्वयंचलित जनित्र,दिव्यांग लोकांसाठी स्वतंत्र रॅम्प,१० व्यक्ती क्षमतेच्या ४ मुख्य लिफ्ट व इतर छोट्या लिफ्ट,कलाकारांना राहण्यासाठी १२ खोल्या,किचनसह उपहारगृह,वेगळ्या इमारतीसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार यांचा समावेश आहे.
मा.शरदरावजी पवार व कुटुंबीयांनी विद्या प्रतिष्ठान मार्फत २००३ साली बारामतीत बांधलेल्या खाजगी “गदिमा सभागृहा” नंतर प्रथमच गदिमांच्या स्मरणार्थ एखादी सरकारी वास्तू पिंपरी चिंचवड (प्राधिकरण) येथे रसिकांसाठी उपलब्ध होत आहे. नुसत्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीच नाही तर आदर्श नाट्यगृह कसे बांधावे यासाठी सुद्धा भेट द्यावी असे सुंदर नाट्यगृह झाले आहे.
गदिमांवरचा स्मारकाच्या बाबतीत झालेला अन्याय काही अंशी दूर करण्याचे काम पिंपरी चिंचवड मनपाने व माजी उपमहापौर श्री.राजू मिसाळ यांनी केले आहे. १० वर्षात खूप अडचणी आल्या,खाली खडक लागला,जिवंत पाण्याचे मोठे झरे लागले पण यावर मात करून सभागृह आता रसिकांच्या सेवेत येत आहे. पुणे महानगरपालिकेने आता हा आदर्श घेऊन गदिमांच्या पुणे स्मारकाला गती द्यावी व महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे गदिमांचा जीवनपट उलगडणारे स्मारक पुण्यात लवकरात लवकर पूर्ण करावे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा