घर Maharashtra Special पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

198
0

पिंपरी । प्रतिनिधी
आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार आहे. तसेच, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे समाविष्ट गावांतील पाणी समस्या सोडवण्याबाबत दिलेल्या आश्वासानाची ‘वचनपूर्ती’ यानिमित्ताने होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सोमवारी, दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि आंद्रा प्रकल्पातील चिखली जलशुद्धीरण केंद्राचे लोकार्पण प्रत्यक्ष होणार असून, उर्वरित प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण व भूमिपूजन होईल. त्यासाठी आकुर्डी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.

लोकार्पण होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे:

महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली येथील १०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आणि इतर कामांचे उद्घाटन, तारांगण प्रकल्प, नवीन प्रशासकीय इमारत भूमिपूजन, ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाचे उद्घाटन, तळवडे येथील इंद्रायणी नदीवरील पंप हाउसचे आणि इतर प्रकाल्प, बोऱ्हाडेवाडी शाळा इमारत, मोशी सब फायर स्टेशन, रावेत येथील उद्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर येथील मध्यवर्ती निर्जुंतूकीकरण पुरवठा विभाग, ब- क्षेत्रीय कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, नेहरुनगर येथील नवीन शाळा इमारत, इंद्रायणीनगर येथील उद्यान व विरंगुळा केंद्र, घरकुल, चिखली येथील भाजी मंडई, निगडी येथील लाईट हाउस प्रकल्प, कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल येथील लॉन टेनिस कोर्ट, प्राधिकरण येथील वीर सावरकर उद्यान से. क्र. २६ येथील लॉनटेनिस कोर्टचे लोकार्पण करण्यात येत आहे.

भूमिपूजन होणारे प्रकल्प पुढीलप्रमाणे :

भामा आसखेड प्रकल्पातील जॅकमेवल्या कामाचे भूमिपूजन, पिंपरी येथील डेअरी फार्म पुल, मोशी-डुडूळगाव येथील प्राथमिक शाळा, गवळीनगर आणि कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र, भोसरी धावडेवस्ती येथील पाण्याची उंच टाकी उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. तसेच, महापालिका हद्दीतील सर्वंकष मालमत्ता सर्वेक्षण करणे व मालमत्तांची सुधारित कर आकारणी करणे, मालमत्ता कर विभागाच्या सर्व सेवा वार्षिक पातळीवर पुरवणे यासह दिव्यांग नागरिकांकरिता निरायम आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा