घर Pimpri-Chinchwad किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान झाला मृत्यू

किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान झाला मृत्यू

86
0

पिंपरी, दि. १२  : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक, अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर आज तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आवारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, सोमाटणे टोल नाका बंद करण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार किशोर आवारे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांची भेट घेण्यासाठी १२ मे रोजी दुपारी नगरपरिषद कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर ते खाली आले असता तळेगाव शहरातील मारुती मंदिर चौकात तेथे दबा धरून बसलेल्या चौघांनी त्यांच्यावर हल्ला हल्ला केला. दोघांनी आवारे यांच्यावर कोयत्याने वार केले तर दोघांनी पिस्तुलातून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आवारे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना हल्लेखोर काही काळ तेथेच थांबले होते असे समजते.

जखमी आवारे यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असल्याचे वृत्त आहे. या प्रकारानंतर परिसरातील तणावाचे वातावरण पाहता बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबई- पुणे महामार्गावरचा सोमाटणे येथील टोल नाका बंद करण्यासाठी किशोर आवारे यांनी पुढाकार घेतला होता. त्यासाठी आंदोलन केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा