घर Uncategorized सुखकर वृद्धत्वासाठी तरुणपणी करा नियोजन: डॉ. घागरे

सुखकर वृद्धत्वासाठी तरुणपणी करा नियोजन: डॉ. घागरे

113
0

पुणे: प्रतिनिधी

सध्याच्या वेगवान आणि अनियमिततेच्या काळात वृद्धापकाळ सुख आणि समाधानाचा जावा यासाठी तरुणांनी आपल्या उमेदीच्या काळापासूनच सर्वच प्रकारचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. महेंद्र घागरे यांनी व्यक्त केले.

‘सुखकर वृद्धत्वासाठी तरुणपणापासून नियोजन’ या विषयावर हरित मित्र परिवारच्या वतीने घागरे रेसिडेन्सी, प्रभात रस्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

सध्याच्या काळात जगणे गतिमान झाले आहे. त्याचप्रमाणे जगण्याच्या सर्व क्षेत्रात मोठी अनिश्चितताही निर्माण झाली आहे. मागील पिढीच्या तुलनेत सध्याचे तरुण कमी वयात अधिक प्रमाणात कमाई करू लागले आहे. त्याचप्रमाणे नोकरी, व्यवसायातील शाश्वती मात्र मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन निवृत्ती नंतरचे जीवन सुखकारक करण्यासाठी कमीत कमी वयापासून सर्वच क्षेत्रांचे नियोजन आवश्यक बनले आहे, ही बाब डॉ. घागरे यांनी निदर्शनास आणून दिली.

नोकरी व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन कमाईच्या काळात काटकसरीची राहणी आणि अधिकाधिक गुंतवणूक, गतिमान जीवनामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावातून ताणले जाणारे नातेसंबंध लक्षात घेऊन नात्यांची मुळे घट्ट करण्याचे नियोजन, बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत जाणारे शारीरिक आणि मानसिक विकार, महाग होत जाणारे वैद्यकीय उपचार हे सर्व लक्षात घेऊन स्वयंपूर्णता प्राप्त होताच आगामी काळाच्या दृष्टीने करण्याचे नियोजनाबाबत डॉ. घागरे यांनी युवकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

  1. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बाहेती यांनी तर आभार प्रदर्शन रुपेश बाहेती यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा