घर Uncategorized विचारवंत आणि सौंदर्यवतीची जोडी रुपेरी पडद्यावर य

विचारवंत आणि सौंदर्यवतीची जोडी रुपेरी पडद्यावर य

503
0

विचारवंत आणि सौंदर्यवतीची जोडी रुपेरी पडद्याव

मुंबई: प्रतिनिधी

राष्ट्रीय पातळीवर मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न करणारा विचारवंत,वक्ता, साहित्यिक,संगीतकार,दिग्दर्शक शरद गोरे यांच्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवरील सौंदर्यवती डॉ.रम्यता प्रफुल्ल ही जोडी रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिका साकारत आहे.

शरद गोरे हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राला भूषण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासह विचारवंतांच्या नावाने राज्याच्या कानाकोपऱ्यात संस्थेच्या वतीने आजवर 156 साहित्य संमेलनं आयोजित करण्यात गोरे यांचा मौलिक योगदान राहिलेले आहे,

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभूषण या ग्रंथाचा काव्यात्मक अनुवाद गोरे यांनी केला आहे.

डॉ. रम्यता या मूळच्या नागापूरकर असून सध्या झारखंड येथे स्थायिक आहेत. त्यांनी मिसेस झारखंड, मिसेस इंडिया, मिसेस एशिया पॅसिफिक हे अंतर्राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.

या साहित्यिक,विचारवंत गोरे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सौंदर्यवती डॉ राम्यता यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर आपल्या मनोरंजनासाठी येत आहे. बुद्धी, विचार आणि सौंदर्याचा हा मिलाफ प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरेल यात शंका नाही

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा