पुण्यातल्या तरुण उद्योजकाची ऐत्याहासिक कामगिरी
Business News (Nitin Yelmar) – उन्हाळ्यामध्ये प्रखर सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत असतो. त्यावर उपाय म्हणून लोकांचा कल कूल, ट्रेंडी सनग्लासेस घालण्याचा आहे.
याच सोशल ट्रेंडनुसार पुण्यातील ‘आशय’ या स्टार्टअपने चिप्स, वेफर्सच्या पाकीटांमध्ये असणाऱ्या मेल्टी लेअर प्लास्टिक (एमएलमी) पासून सनग्लासेस तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ‘आशय’ या स्टार्टअपचा फाउंडर संस्थापक अनिश मालपाणी यांच्या म्हणण्यानुसार प्लास्टिक रिसायकल करुन सनग्लासेस तयार करणारे आशय जागातले पहिले स्टार्टअप आहे.
अनिशच्या म्हणण्यानुसार, “प्लास्टिक ही जगातील सर्वात वाईट गोष्ट नाही. त्याची विल्हेवाट कशी लावायची हे आपल्याला सोडवायचे आहे.” पुण्यातील प्रयोगशाळेत मल्टीलेयर प्लास्टिक (MLP) पासून पुनर्वापर केलेले सनग्लासेसचे संशोधन आणि तयार करण्यात दोन वर्षे मेहनत घ्यावी लागली.
सनग्लासेसची बीटा आवृत्ती 1,099 रुपयांच्या विशेष किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. “विदाउट” या ब्रँड नावाखाली लाँच केलेले सनग्लासेस, यूव्ही पोलराइज्ड, युनिसेक्स आहेत आणि त्यांचे वजन फक्त 25 ग्रॅम आहे. ग्राहक सनग्लासेसच्या बाजूला असलेला QR कोड स्कॅन करून त्यांची निर्मिती करण्यासाठी किती पॅकेट्स वापरण्यात आली, कचरा गोळा करणार्याठ कामगारांनी कोणती पॅकेट गोळा केली इत्यादी पाहू शकतात.
जेव्हा मालपाणी यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांचे सोशल इम्पॅक्ट स्टार्ट-अप आशय सुरू केले, तेव्हा त्यांना मल्टीलेयर प्लास्टिकची समस्या सोडवण्यावर काम करायचे होते ज्यांचे पुनर्वापर करणे कठीण आहे, असे भारतातील लिडिंग वृत्तपत्राने वृत्त दिले होते.
या सनग्लासेसमधून मिळणार्या, उत्पन्नातून कचरा गोळा करणार्याा कामगारांना मदत केली जाणणार आहे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी देण्यात येणार आहे, ही सनग्लासेसमागील संकल्पना आहे असा व्हिडिओ त्याने प्रदर्शीत केला आहे.
आशयाने आश्वासन दिले आहे की हे सनग्लासेस अनब्रेकेबल आहेत. आणि जर तुम्ही त्यांची मोडतोड केली तर, स्टार्टअप त्यांना पुन्हा गोळा करेल आणि रीसायकल करेल.
घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण, प्लास्टीक तुकड्याचे विघटन होण्याकरीता जाणारी लाखो वर्षे, यावर उपाय म्हणून आपल्याच देशातील एका तरुणाने सुरू केलेले स्टार्टअप क्रांतीकारी पाऊल ठरू शकते.
वयाच्या 9व्या वर्षी आईवडिलांसोबत दुबईला स्थायीक झालेला आशिष मालपाणी तेथील मोठ्या पगारचा जॉब सोडून भारतामध्ये परत आला आणि आशय हे स्टार्टअप सुरू केले. प्रत्येक तरूण उद्योजकासाठी हे स्टार्टअप प्रेरणादायी आहे ज्यांना काही हटके करण्याची इच्छा आहे.
– Nitin Yelmar (Communication Strategy Consultant l Media Consultant)