घर Pimpri-Chinchwad ‘प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात उद्योजकता विकास’ विभागस्तरीय एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

‘प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात उद्योजकता विकास’ विभागस्तरीय एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

93
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने 18 मार्च 2023 रोजी ‘ उद्योजकता विकास’ या विषयावर एक दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यशाळेत पिंपरी चिंचवड परिसरातील विविध महाविद्यालयातील 220 विदयार्थी सहभागी झाले सदर कार्यशाळेत ‘ उद्योजकता विकास’ या विषयावरती प्रथम सत्रामध्ये श्री. अभय बारटक्के यांनी उद्योजकांसाठी असणाऱ्या विविध वित्तपुरवठ्याचे स्त्रोत कशा प्रकारे मिळवण्याचे मार्ग ,
 व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या समस्या मधून मार्ग कशा पद्धतीने मार्ग काढायचे याविषयी विविध उदाहरणांचे दाखले देऊन आपले मत विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच व्यवसायासाठी भांडवल, पैसा वाचवणे गरजांनुसार प्राधान्यक्रम देऊन एक यशस्वी उद्योजक कसे बनायचे याविषयी मार्गदर्शन केले
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये श्री. मनोहर बोरगावकर यांनी “व्यवसाय कौशल्य ” या विषयावर मार्गदर्शन केले सदर सत्रांमध्ये ‘sale of goods’ ,’sale of service’ , आणि ‘sale of idea’ याविषयी माहिती दिली. नवीन बाजारपेठ व ग्राहक कसे मिळवावे याविषयी विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांना व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले
तिसऱ्या सत्रामध्ये श्री नितीन बिराजदार यांनी ध्यानधारणा, प्राणायमातील विविध प्रकारातून ताण तणाव मुक्त अभ्यास कशा पद्धतीने करता येतो. याबाबत विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सहभागी झालेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी महाविद्यालयामार्फत  राबवित असलेल्या विविध व्यवसाय कौशल्यावर आधारित उपक्रमांची माहिती  देऊन विद्यार्थीनी स्वयं रोजगारासाठी उत्तेजित केले. उपप्राचार्य बी.जी.लोबो, डॉ. एच.बी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सारिका मोहोळ, डॉ. मधुकर राठोड,डॉ. सविता वासुंडे,डॉ. रामदास लाड,डॉ. दत्तात्रय भांगे यांनी कार्यक्रमांचे नियोजन केले. तसेच सदर कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये रोशन पजई, प्राजक्ता ताम्हाणे,तेजल चोरमारे,दिपाली घुले, कनिष्का इंगळे, या विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा