घर Pimpri-Chinchwad मोरया गोसावींचा आशिर्वाद घेऊन नाना काटेंनी फुंकले पोटनिवडणुकीचे रणशिंग…

मोरया गोसावींचा आशिर्वाद घेऊन नाना काटेंनी फुंकले पोटनिवडणुकीचे रणशिंग…

141
0

पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अवघ्या १५ दिवसांवर आली असल्याने महाविकास आघाडी अतिशय जोरात प्रचारात उतरली आहे. आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्याठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले आहेत. जयंत पाटील यांच्या आगमनाने महाविकासआघाडी कार्यकर्त्यांना नवा उत्साह मिळाला आहे.

श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरा चा परिसरात मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिंचवड गावात आणि चिंचवडकरांच्या अस्मिता असणाऱ्या महान साधू मोरया गोसावी यांच्या चरणी नारळ अर्पण करून श्रींची महाआरती करत आज महाआघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रचाराची सुरुवात केली आहे. यानंतर चाफेकर चौकातील चाफेकर बंधूंच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी निरीक्षक आमदार सुनील आण्णा शेळके, आमदार अण्णा बनसोडे, आमदार विलास लांडे, माजी महापौर संजय वाघेरे, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, चिंचवड विधानसभेचे प्मारचार प्जीरमुख भाऊसाहेब भोईर, महापौर मंगलाताई कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष, कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविताताई अल्हाट, नरेंद्र बनसोडे, विधानसभा प्रमुख अनंत कोराळे, अपर्णाताई डोके, राजेंद्र गावडे, सुनील गव्हाणे व पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने या प्रचार शुभारंभासाठी उपस्थित होते. चिंचवड मतदारसंघात महाविकासआघाडीतील तीनही पक्षांची चांगली ताकत आहे. या एकजुटीचा थेट फायदा नाना काटे यांना या निवडणुकीत होताना दिसत आहे.

यावेळी उसळलेली गर्दी महाविकास आघाडीचा आत्मविश्वास द्विगुणित करणारी ठरणार आहे. यापुढील काळात अधिक उत्साहाने प्रचारात सक्रिय होण्यासाठी मोठी मदत आज झालेल्या या प्रचार शुभारंभाने होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा