घर Maharashtra Special चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक २८ उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक २८ उमेदवारांसाठी निवडणूक चिन्ह वाटप

105
0

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी  दि.१० फेब्रुवारी रोजी  दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. वैधपणे नामनिर्दिष्ट ५ उमेदवारांनी विहित मुदतीत आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये २८ उमेदवार असणार आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया आज पार पडली असून  निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी चिन्ह वाटप जाहीर केले.

या पोटनिवडणुकीसाठी ३३ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले होते. तर ७ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले होते. विहित मुदतीत ५ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर उर्वरीत २८ उमेदवारांसाठी  निवडणूक  चिन्ह वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना  त्या पक्षांसाठी राखीव असलेली चिन्हे देण्यात आली. नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांना भारतीय निवडणूक आयोगाने सूचीबद्ध केलेल्या १९७ मुक्त चिन्हांमधून उमेदवारांनी दिलेला पसंतीक्रम, त्यांची मागणी विचारात घेऊन  तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत पद्धतीने चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी  सहाय्यक निवडणूक अधिकारी अजित पाटील, निवडणूक सहायक तथा तहसीलदार नागेश गायकवाड, प्रशांत शिंपी, माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह नामनिर्दिष्ट  उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे   निवडणुक  निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या थेरगांव येथील निवडणुक  निर्णय अधिकारी कार्यालयामधील   कक्षामध्ये  चिन्ह वाटप प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

उमेदवारी   मागे  घेतलेल्या  उमेदवारांच्या माहितीचा  तपशील   :-

अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव
राजेंद्र मारुती काटे अपक्ष
भाऊसाहेब रामचंद्र अडागळे अपक्ष
प्रवीण अशोक कदम संभाजी ब्रिगेड पार्टी
अॅड.मनिषा मनोहर कारंडे अपक्ष
रविंद्र पारधे (सर ) अपक्ष

 

 

 चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक २०२३ मधील  उमेदवार आणि त्यांना मिळालेले चिन्ह  :-

अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव चिन्ह
अश्विनी लक्ष्मण जगताप भारतीय जनता पार्टी कमळ
विठ्ठल उर्फ नाना काटे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ
प्रफुल्ला मोतलिंग महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी कप आणि बशी
मनोज मधुकर खंडागळे आजाद समाज पार्टी(कांशीराम ) किटली
लोंढे तुषार दिगंबर बहुजन भारत पार्टी बॅटरी टॉर्च
अॅड.सतिश श्रावण कांबिये बहुजन मुक्ती पार्टी खाट
अजय हनुमंत लोंढे अपक्ष ऑटो रिक्शा
अनिल बाबू सोनवणे अपक्ष पाटी
अमोल ( देविका) अशोक सूर्यवंशी अपक्ष ऊस शेतकरी
१० कलाटे राहुल तानाजी अपक्ष शिट्टी
११ किशोर आत्माराम काशीकर अपक्ष बॅट
१२ गोपाळ यशवंतराव तंतरपाळे अपक्ष कपाट
१३ चंद्रकांत रंभाजी मोटे अपक्ष टेबल
१४ जावेद रशिद शेख अपक्ष नारळाची बाग
१५ दादाराव किसन कांबळे अपक्ष प्रेशर कुकर
१६ बालाजी लक्ष्मण जगताप अपक्ष बुद्धीबळ पट
१७ बोधे सुभाष गोपाळराव अपक्ष हिरा
१८ डॉ.भोसले मिलिंदराजे अपक्ष फलंदाज
१९ मिलिंद कांबळे अपक्ष गॅस सिलेंडर
२० मोहन भागवत म्हस्के अपक्ष फुटबॉल
२१ रफिक रशिद कुरेशी अपक्ष अंगठी
२२ राजू उर्फ रविराज बबन काळे अपक्ष कॅमेरा
२३ शेख सोयलशहा युन्नुसशहा अपक्ष हेलीकॉप्टर
२४ श्रीधर साळवे अपक्ष कॅरम बोर्ड
२५ सतिश नाना सोनावणे अपक्ष चालण्याची काठी
२६ सिद्धिक ईस्माइल शेख अपक्ष सफरचंद
२७ सुधीर लक्ष्मण जगताप अपक्ष जहाज
२८ हरीष भिकोबा मोरे अपक्ष शिवण यंत्र

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा