घर Pimpri-Chinchwad चिंचवड विधानसभा जिंकण्यासाठी सज्ज व्हा – मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

चिंचवड विधानसभा जिंकण्यासाठी सज्ज व्हा – मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

166
0
भाजपच्या अश्विनी जगताप यांना एक लाखांहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्याचा सर्व माजी नगरसेवकांचा निर्धार
पिंपरी, दि. ४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे सर्व माजी नगरसवेक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच पोटनिवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आल्याचे मंत्री महाजन यांनी जाहीर केले. शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली अश्विनी जगताप यांना एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत केला.
अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. जगताप कुटुंबातील सर्वांशी त्यांनी संवाद साधून निवडणुकीबाबत चर्चा केली. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, संदीप खर्डेकर यांच्यासह पक्षाचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर पक्षाच्या प्रचाराची आणि मतदारांपर्यंत पोहचण्याची रणनिती आखण्यात आली. ही निवडणूक मताधिक्याने जिंकण्यासाठी सर्वांनी आजपासूनच कामाला सुरूवात करण्याचे आवाहन त्यांनी केले. शंकर जगताप यांनी एक लाख मताधिक्याने अश्विनी जगताप यांना निवडून आणण्याचा संकल्प जाहीर केला. सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली अश्विनी जगताप यांना एक लाखांहून अधिक मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा