घर Pimpri-Chinchwad आमदार अण्णा बनसोडे हाफकीन कामगार व  कुटूंबियांच्या मदतीला

आमदार अण्णा बनसोडे हाफकीन कामगार व  कुटूंबियांच्या मदतीला

105
0

जीवरक्षक लसी व औषधे यांना वाढत असलेली मागणी व उत्पादन प्रक्रियेसाठी करावा लागणारा विस्तार लक्षात घेता, 1975 साली हाफकिन या संस्थेचे विभाजन करुन औषधे निर्मितीसाठी कारखाना अधिनियम 1956 अंतर्गत पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत उपक्रम असलेले हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ मर्यादित याची स्थापना केली. 1977 साली गोळ्या, कैपस्युल्स्, मलम इ. करिता हाफकिन उपकंपनी स्थापन केली गेली.

औषध निर्माण क्षेत्रातील मानव सेवेस समर्पित हे ब्रीदवाक्य असलेले हाफकिन महामंडळ जैविक व अजैविक, विशेषकरुन अणुजीव लस निर्मिती, प्रतिविष व रक्तजल निर्मिती व औषध उत्पादन व पुरठा करण्यात अग्रेसर आहे.त्याच औषध निर्मिती कंपनीचे एक युनिट पिंपरी येथे आहे.याच हाफकीन कंपनी पिंपरी ने पोलिओ व जागतिक लसीकरण मध्ये  महत्वाची भूमिका निभावली आहे त्यातून अनेक जीवांना प्राण मिळाले पण ज्यांनी इतराना जगवले आयुष्य सुखकर केले ज्यांनी हाफकीन घडवले अशा तृतीय व चतुर्थ श्रेणी कामगार मात्र जीवावर उधार होत व आपल्या कुटीबीयांना मरणासन्न अवस्थेत असलेल्या घरात आपले आयुष्य जगत आहेत.पिंपरी हाफकीन कामगार वसाहत ही 50 वर्षे जुनी वसाहत असून तिथे कामगारांसाठी बांधलेली घरे ही आता शेवटची घटका मोजत आहेत तसा अहवालाच सार्वजनिक बांधकाम अहवालाने सादर केला आहे.सदर अहवालामधून धडा घेत तिथे राहणाऱ्या कामगारांना नवीन घरे बांधव देण्या ऐवजी तिथल्या कामगारांना घरे खाली करा अशी नोटीस काढली गेली आहे.ज्यांनी देशाचे स्वास्थ्य आबाधित रहावं म्हणून काम पाहिलं त्यांनाच आता बेघर करण्याचा डाव हाफकीन प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे.त्या कामगारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आज थेट हाफकीन कामगार वसाहतीला भेट देऊन तिथे राहणाऱ्या कामगारांच्या व्यथा व अडचणी जाणून घेतल्या.

गेली अनेक वर्षे कामगार कुचकामी ठरलेल्या इमारती मध्ये राहून आपले आयुष्य जगत आहेत त्यांनी कधी त्याबद्दल तक्रार केली नाही.कुठे इमारतीचा ढाचा मोडकळीस आला आहे तर कुठे भिंती खचलेली आहेत  तर कुठे छत ढासळलेलं आहे याची प्रत्यक्ष पाहणी आमदार अण्णा बमसोडे यांनी केली व शक्य तितक्या लवकर कामगारांना त्यांच्या हक्काचे सुरक्षित घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.कामगारांनी सर्व युनियन व अंतर्गत वाद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून स्वतःच्या घरासाठी सोबत एकत्र उभे रहावे असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी केले.हाफकीन महामंडळाला पूर्ण वेळ कार्यकारी संचालक नाही तरी संबंधित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी येत्या मंगळवारी संबंधित अधिकारी,मंत्री व मुख्यमंत्री यांना भेटणार आहे व कामगारांना त्वरित घरे मिळवून देण्यासाठी पर्यायांची चाचपणी करून घरे मिळवून देऊ असा विश्वास आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्व कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा