घर Maharashtra Special महाविकास आघाडी कडून चिंचवड मधून राहुल कलाटे तर कसबा मधून रविंद्र धंगेकर?

महाविकास आघाडी कडून चिंचवड मधून राहुल कलाटे तर कसबा मधून रविंद्र धंगेकर?

155
0
पुणे चिंचवड पोटनिवडणूक साठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.  पुणे पोटनिवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचा वाट्याला कसबा तर चिंचवड पोटनिवडणुक लढवण्यासाठी महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी पक्षा कडे जाणार हे निश्चित झाले आहे.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र कसब्यात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर चिंचवडमधून राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांचं नाव उमेदवारीसाठी निश्चित केल्याचे समजते. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी लवकरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पत्रक काढून ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा