आळंदीत होणार ट्रक टेम्पो बस ऑटो टॅक्सी संघटनांचे राष्ट्रीय अधिवेशन
– बाबा कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजन
पिंपरी / प्रतिनिधी-
देशभरातील ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक यासह वाहतूकदार संघटना असणाऱ्या राष्ट्रीय चालक एकता महामंच राष्ट्रीय अधिवेशन आळंदीत होणार आहे. शनिवारी (दि. 21) रोजी राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी पदाधिकारी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.
” देशभरातील बावीस करोड पेक्षा अधिक वाहन चालक मालकांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आयोग गठीत करावा, देशभरामध्ये ड्रायव्हर डे घोषित करावा, शहीद झालेल्या ड्रायव्हर साठी देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रीय स्मारक बनवावे, देशभरातील सर्व चालक-मालकांसाठी सोशल वेल्फर कल्याणकारी बोर्ड तयार करण्यात यावे, यास देशभरातील स्थानिक पातळीवरील विविध राज्यातील विविध मागण्यावर या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे,
देशभरातील ऑटो रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रकच्या हक्कांसाठी विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय चालक एकता महामंच काम करत आहे. संबंधीत वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांना न्याय मिळवून देत आहे. या विचारमंचच्या नेतृत्त्वाखाली देशव्यापी वाहतूकदार संघटनांचे संघटन बांधण्यात आले. देशभरातील बस टॅक्सी ट्रक संघटनांनी यामुळे सहभागी झाले असून देशपातळीवरील संघटन म्हणून हे संघटन उभे राहत आहे, ट्रक टेम्पो बस चालकांच्या प्रश्नांसाठी देशव्यापी आंदोलने उभारण्याचा मानस देखील आहे. त्या बाबत विचारमंथन करण्यासाठी आळंदीत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
*दि,21-1-2023 रोजी सकाळी 10 वाजता समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी हे अधिवेशन संपन्न होणार आहे*
या संदर्भामध्ये प्रमुख कार्यकर्त्याची आळंदी येथे बैठक घेण्यात आली यावेळी, बाबा कांबळे, बळीराम काकडे, प्रियश सोनवणे, ह भ प संदीपान महाराज घायाळ, चंद्रकांत कानडे, सिद्धेश्वर सोनवणे, रामदास मैत्रे, शिवाजी मुसळे, सतीश घुगे, मारुती पाचरणे, आधी उपस्थित होते,
आळंदी देवाची पुणे येथे देशातील सर्व ऑटो रिक्षा, बस, टॅक्सी, चालक-मालकांचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला देशभरातील रिक्षा, टॅक्सी व वाहतूकदार संघटना उपस्थित राहणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, उडीसा, पश्चिम बंगालसह देशभरातील वाहतूकदार संघटना उपस्थित राहणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
बाळासाहेब ढवळे, संतोष गुंड, सिद्धार्थ सोनवणे, लक्ष्मण शेलार, सुरत सोनवणे, दिनेश तापकीर, एडवोकेट प्रियश सोनवणे, मल्हार भाऊ काळे, सुलतान शेख, रामदास मैत्रे, अर्जुन मदनकर, आधी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेत आहेत,