घर Pimpri-Chinchwad “पी सी एम सी १०० भ्रष्टाचार की एक बात” भाग दहावा –...

“पी सी एम सी १०० भ्रष्टाचार की एक बात” भाग दहावा – औष्णिक धुरीकरण (औषध फवारणी) घोटाळा.

200
0

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शहरातील लाखो करदात्यांच्या पैश्याची भ्रष्टपद्धतीने प्रत्येक विभागात कशी लूट केली जाते. या बद्दलचा लेखा जोखा आपण “पी सी एम सी १०० भ्रष्टाचार की एक बात” या सदराखाली आपण पहात आहोत. आजचा दहाव्या भागामध्ये डेंगू, मलेरिया,चिकणगुणिया या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी पिंपरी महापालिका प्रशासन किती गंभीर आहे.हे स्पष्ट होते. शहरात दरवर्षी डेंगूने अनेकांचे प्राण जातात.पिंपरी चिंचवड परिसरात डेंगू मलेरिया रोगास आपण का प्रतिबंध करू शकत नाहीत त्यातील काही कारणांपैकी धुरीकरण प्रामाणिकपणे न करणे हे सुद्धा एक कारण ठरले आहे. जगामध्ये “एडीस”जातीच्या डासांवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी औष्णिक धुरीकराचा मोठा उपयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अळीनाशक पायरोसीन ऑईल,टेमिफॉस,डेल्टामेथ्रीन केओथ्रीन कीटकनाशके वापरून औष्णिक धुरीकरण करून ह्या रोगांवर मोठ्या प्रमाणात आळा घातला जातो. परंतु आपल्या महापालिकेत मात्र त्यामध्ये सुद्धा मलई कशी प्राप्त होइल याकडे पाहिले गेले ही दुर्दैव्याची बाबा आहे.आता औष्णिक धुरीकरणात कसा गैरप्रकार होतो त्याचे एक उदाहरण पाहू.

 “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात औष्णिक धुरीकरण करण्याकरिता  रिक्षा टेम्पो भाड्याने घेणे या कामासाठी निविदा प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले.प्राप्त झालेल्या एकूण तीन निविदांमधून  मे श्री जगन्नाथ महिला स्वयंरोजगार सेवा सह संस्था मर्यादित यांची निविदा प्रति दिन प्रति रिक्षा ५९० अशी निवडली गेली.कार्यादेश क्रमांक १६८, दिनांक ३०/०४/२०१५ प्रति दिन तीन टेम्पो उपलब्ध करून देणेबाबत आदेश देण्यात आले. या कामाचे ठेकेदारास २,२४८३१ रुपये अदा केले गेले.
  कोणत्याही प्रकारची वाहन संदर्भातील विमा,फिटनेस,पासिंग कागदपत्रे न तपासता व जमा करता संपूर्ण  धुरीकरणासाठी फक्त एकच टेम्पो (MH14DM 3853) वापरल्याचे कागदपत्रात स्पष्ट झाले. उरलेल्या दोन वाहनांची फक्त कागदावर बोगस पद्धतीने नोंद केल्याचे दिसून आले. म्हणजे औष्णिक धुरीकरण फक्त कागदावरच दाखवले गेले,प्रतक्ष्यात दिली गेलेली औषधे न वापरता  धुरीकरण केलेच नसल्याचे स्पष्ट झाले.बिले मात्र सर्व जमा करून सर्व रक्कम प्राप्त केली गेली.
     डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ या कालावधीत वाहनांचे भाडे देताना  वाहन क्रमांक MH14 AS 4879 हे वाहन प्रति दिन दोन वेळा पुरवले गेल्याचे अहवालात सादर केले गेले. एका वाहनाची दोन वेळा नोंद करुन भाडे उकळले गेले.प्रति दिन ३०० याप्रमाणे १८६००/- रुपये ठेकेदारास जास्त दिले गेल्याचे दिसून आले.
   अश्या पद्धतीने औष्णिक धुरीकरण होत असल्यास शहरात डेंगू ,मालेरियावर नियंत्रण मिळवता येईल का? हे आता सर्वांनीच आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.सर्व प्रकारचे कर भरून भ्रष्ट कारभाराची झळ जर प्रत्येक नागरिकांच्या घरात पोहचत असेल आणि आरोग्याचे नुकसान होत असेल तर त्या प्रशासनाला डोक्यावर घेणे योग्य वाटते का? असा प्रश्न उभा राहतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा