घर Pimpri-Chinchwad शरद पवार यांच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

शरद पवार यांच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

202
0

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. शुक्रवारी (दि. ६) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन जगताप कुटुंबियांचे सांत्वन केले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील त्यांच्यासोबत होते. शरद पवार यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच जगताप यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. या दुःखातून सावरण्यासाठी जगताप कुटुंबाला धीर दिला.

यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप, लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या बहिणी व इतर सर्व नातेवाईक उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा