घर Pimpri-Chinchwad विपक्ष नेत्यांची मति ठिकाणावर आहे का? – भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार

विपक्ष नेत्यांची मति ठिकाणावर आहे का? – भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार

135
0
महाराष्ट्र राज्यात गत काही महिन्यांपूर्वी “शिवशाही सरकार” आले असून,पूर्वी सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांत मतिमंदता आली असल्याचे जाणवते आहे.
सत्ता गेल्याच्या विचाराने “महाविकास आघाडी” भकास झाली असल्याचे जाणवते आहे. त्यांच्या नेत्यांना कुठे काय बोलावे याचे भान राहिले नाही. उबाठा शिवसेनेचे खा.संजय राऊत,आ.भास्कर जाधव,विपक्ष नेते अंबादास दानवे – काँग्रेसचे आ.नाना पटोले – राष्ट्रवादीचे विपक्ष नेते अजित पवार,खा.सुप्रिया सुळे,आ.छगन भुजबळ आदी. सर्व महाविकास आघाडीची नेते मंडळी कोणत्या न कोणत्या कारणावरून चर्चेत राहण्याची सवय लागली असून,माध्यमांद्वारे चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांवर समोर आले तर निश्चितच महाराष्ट्राला अभिमान वाटला असता,परन्तु तुम्ही नेतेमंडळी व दोन्हीही विपक्ष नेते हे कायम विवादित वक्तव्य करून चर्चेत राहत असल्याने “विपक्ष नेत्यांची मति ठिकाणावर आहे का?” असा आरोप करण्याचे कारण असे की,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विपक्ष नेते अजित पवार यांनी विदारक,विवादित वक्तव्य केले असून,ते माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे थेट माध्यमांसमोर सांगत असतात,परन्तु तुम्ही कितीही ठाम राहिलात तरीही,छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर-स्वराज्यरक्षक होते यात कदापि शंका नाहीच…!
राज्याचे दुसरे विपक्ष नेते तर थेट सत्तेतील मंत्री व आमदारांना बुटाने मारण्याचे आरोप करत सुटलेले आहेत,या महाराष्ट्राने एवढे मति वाया गेलेले विपक्ष नेते आजवर निश्चितच पाहिले नसतील किंवा अनुभवलेही नसतील. दोन्हीही विपक्ष नेत्यांनी विधिमंडळ कायद्याचे एकवेळ वाचन करून आपले वर्तन कसे असावे हे विधानसभा अध्यक्ष यांजकडून समजून घेतले पाहिजे. नाहीतर विपक्ष नेत्यांची मति ठिकाणावर आहे का? असे बोलणे वावगे ठरणार नाही,असे भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार यांनी सांगितले…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा