घर Uncategorized शहर भाजपचा झुंजार नेता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निधन!!! पिंपरी चिंचवड शहरावर...

शहर भाजपचा झुंजार नेता आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे निधन!!! पिंपरी चिंचवड शहरावर शोककळा

153
0

 

विश्व सह्याद्री न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचे आज (मंगळवार, ३ जानेवारी) निधन झाले. जगताप हे मागील काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. ते 59 वर्षांचे होते. बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी 9 वाजून 29 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. भाऊ या नावाने ते परिचित होते. पिंपरी चिंचवड पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्ता खेचून आणत भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवून देण्यात आमदार जगताप यांचा मोठा वाटा आणि राजकीय चाणाक्षपणा उपयुक्त ठरला.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोठे नेते म्हणून लक्ष्मण भाऊ जगताप यांची ओळख होती. महापालिकेत 20 वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष तसेच 2000 मध्ये पिंपरी चिंचवड शहराचे महापौरपद देखील भूषविले. 2004 मध्ये पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अपक्ष निवडून येत विधानपरिषदेत प्रतिनिधीत्व केले. 2009 मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि पहिल्याच निवडणुकीत लक्ष्मण जगताप अपक्ष निवडून आले. दरम्यान 2014 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्येच त्यांनी तत्कालीन भाजप नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवडमधून भाजपच्या चिन्हावर ते निवडून आले. शहरातील भाजपचे ते पहिले आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीतही भाजपकडून निवडून येत ते चौथ्यांदा आमदार झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक तसेच शहरवासीय हळहळ व्यक्त केली जात आहे. भाजपने एक झुंजार नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा व्यक्त केली जात आहे. विश्व सह्याद्री न्यूज घ्या वतीने आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा