घर Uncategorized न्यू आर्टस् महाविद्यालयात बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा...

न्यू आर्टस् महाविद्यालयात बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न 

160
0
बेलापूरच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रणाली पाटील ने पटकावला करंडक
अहमदनगर (प्रतिनिधी):  ह. कृ. तथा बाळासाहेब काळे ज्यांचे विचार समकालीन समाजासाठी प्रेरणादायी आहेत. ते स्वतः उच्चशिक्षित असून ही त्यांनी नोकरी न करता अहमदनगर सारख्या दुर्गम जिल्ह्यातील कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे कार्य केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालवण्याचं काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर संजय कळमकर सरांनी केले. तसेच भाषण कसे असावे याविषयी त्यांनी भाष्य केले व भाषणातील नैसर्गिकता लोप पावत चाललयाची खंत त्यांनी येथे व्यक्त केली.
       नगर शहरातील निवास कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे आयोजित कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
      यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. रामचंद्रजी दरे साहेब हे उपस्थित होते. त्यांनी ही ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व सहकारी क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव काळे, अशोकराव काळे, पोपटराव काळे, डॉ. मेधा काळे, डॉ. अरूणाताई काळे, सुवर्णा साबळे, मांडे सर,  प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी. सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. ई. आठरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. एस.बी. कळमकर पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजी साबळे  व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये राज्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील 22 विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. परीक्षक म्हणून डॉ. संतोष पवार व डॉ. संजय दरवडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुवर्णा कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. के एम. अंबाडे यांनी केले.  आभार मानले.डॉ. मीना साळे यांनी मानले.
पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एच झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. मेधाताई काळे उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आभार डॉ. राजेंद्र साबळे यांनी मानले.
प्रा. निलेश लंगोटे प्रा. निखिल गोयल, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. सचिन काळे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
 या स्पर्धेत बेलापूरच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रणाली पांडुरंग पाटील हिने २५०० रुपये रोख पारितोषिक आणि प्रथम क्रमांकाचा फिरता करंडक पटकावला.  दुसरे बक्षीस न्यू आर्टस् कॉलेज पारनेर रुपये २००० रुपये रोख व प्रमाणपत्र सपना ठाणगे, तिसरे बक्षीस ११०० रुपये रोख आणि प्रमाणपत्र रामहरी कल्याण जाधव याला मिळाले. उत्तेजनार्थ बक्षीस ११०० रुपये रोख आणि प्रमाणपत्र ऋतुजा जाधवर , कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आणि ढोकणे सोमनाथ भाऊसाहेब ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांनी मिळवले. विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित सर्वानी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा