घर Pimpri-Chinchwad रोटरी क्लब पिंपरीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

रोटरी क्लब पिंपरीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

237
0

पिंपरी: रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने” नन्हे कदम” या सामाजिक आणि महान उपक्रमात अंतर्गत गरजू शालेय विद्यार्थ्यांना नुकत्याच सायकली वाटप करण्यात आल्या.

यासाठी शहरातल्या अनेक सोसायटीतील रहीवाशी यांच्याशी संवाद साधून वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या अनेक सायकल्स गोळा करुन त्यांची योग्य ती दुरुस्ती करून पिंपरी चिंचवड मधील काही शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोट्रॅक्ट क्लब ऑफ पिंपरीच्या सहकार्याने त्या प्रदान करण्यात आल्या.

तळवडे येथील सरस्वती विश्व विद्यालय येथे हा सोहळा नुकताच संपन्न झाला,यावेळी मुख्य पाहुणे म्हणून अल्ट्रा सायकलिस्ट असीम दरेकर ,मुख्याध्यापिका क्षमा गर्गे रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष संजय प्रधान,सचिव संतोष गिरंजे ,रोटरीयन सुर्यकांत जाधव, सन्नी सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुलांना सायकल्स वाटप करतानाच सायकलिंग करण्याचे महत्व पटवून दिले आणि आनंदीत झालेल्या विद्यार्थ्यांनी या सायकल्सचे उत्तम संगोपन करण्यासह नियमित सायकल चालवून शरीरसंपदाही कमवू असे भावपूर्ण वचन देताच या उपक्रमाचे चीज झाले अशी भावना सर्वच उपस्थित मान्यवरांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा