घर Pimpri-Chinchwad आकुर्डी येथे जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन आनंद मेळावाला उस्फुर्त प्रतिसाद

आकुर्डी येथे जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन आनंद मेळावाला उस्फुर्त प्रतिसाद

224
0
पिंपरी :  निगडीत पिं.चिं. पोलीस आयुक्तालयामार्फत ज्येष्ठांकरीता आनंदी जीवन मार्गदर्शन मेळावा शनिवार, दि.17 डिसेंबर 2022 रोजी  कृष्णा सहकारी गृह रचना हाउसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला.
यावेळी परीसरातील शरद हाउसिंग सोसायटी, स्नेह सदन हाउसिंग सोसायटी व भउसिंग सोसायटी, रस्टन हाऊसिंग सोसायटी, जयंती हाउसिंग सोसायटी, इंडियन कार्ड हाउसिंग, इतर काही हाऊसिंग सोसायटी व फ्लॅटधारक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. सुमारे शंभर ते दीडशे ज्येष्ठ नागरिकांनी मेळावामध्ये सहभाग घेतला.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात तर्फे आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक विभागाचे प्रमुख पोलीस अधिकारी  राजाराम शेळके व राजेंद्र होनराव यांनी मेळावास मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निराकरणासाठी तसेच आनंददायी, सुरक्षित आणि निश्चिंत आयुष्य जगण्यासाठी  पोलीस अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती, फोन नंबर व पत्ते दिले की जिथे ज्येष्ठ नागरिक संपर्क करू शकतात.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, परिसरातील जे नागरिक अलिप्त राहतात किंवा ज्यांना मदतीची गरज आहे अशा ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून पोलीस कक्षालयाकडे देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची प्रास्ताविक कृष्णा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबुराव फडतरे यांनी केले. कृष्णा सहकारी सोसायटीचे सचिव अनिल चव्हाण आणि सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रा. भूषण ओझर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा