पिंपरीः पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अकुंश शिंदे यांची नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण भोवलं असल्याची चर्चा पोलिस आयुक्तालयाच्या वर्तुळात सुरु आहे.
राज्याच्या गृह विभागात आयपीएस अधिका-यांच्या बदल्या आणि पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आल्या आहेत. त्यानूसार बदली आणि पदोन्नतीचे स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त अकुंश शिंदे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विनयकुमार चौबे यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी हे आदेश दिले आहे.