घर India सोनाली झोळने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदल परिषदेत भारताचे केले प्रतिनिधित्व

सोनाली झोळने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदल परिषदेत भारताचे केले प्रतिनिधित्व

963
0

ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ चे डायरेक्टर प्रा.भूषण ओझर्डे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन

पुणे : ग्रामीण भागात बालपण व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या सोनाली झोळ Uragve येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदल Intergovernmental negotiating commitee INC परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. पर्यावरण आणि प्लास्टिक प्रदूषणामुळे जीवसृष्टीवर होणारे  परिणाम या विषयी उर्ग्वे येथे होत असलेल्या  संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण बदल परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. यासाठी तीला पिंपरी चिंचवड मधील ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ चे डायरेक्टर प्रा.भूषण ओझर्डे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

अनेक देशांनी गेल्या पाच ते सहा दशकांत केलेल्या औद्योगिक क्रांतिनंतर त्यांची जीवनशैली सुधारली. या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या हरित प्लास्टिक प्रदूषणाचे आणि नैसर्गिक नुकसानाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. प्लास्टिक प्रदूषणाचे जगासाठी मोठे संकट ठरले आहे. दर वर्षी विविध देशांमध्ये होणारी ही संयुक्त राष्ट्रांची जागतिक पर्यावरण बदल परिषद खऱ्या अर्थाने चर्चेत येत आहे, ते या परिषदेत वाढलेल्या तरुणांच्या सहभागामुळे. पर्यावरण बदलांवर मार्ग काढण्यासाठी वर्षानुवर्षे चर्चेची गुऱ्हाळे दळणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींना नव्या पिढीची प्रतिनिधी, म्हणून भारताकडून सोनाली प्लॅस्टिक प्रदूषणा बद्दल आपले मत मांडत आहे.  जगभरातील प्लॅस्टिक प्रदूषण समस्यांवर बोलणारी सोनाली नव्या पिढीची आदर्श ठरली आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक माध्यमांचा कुशलतेने वापर करीत सोनाली तिचे कार्य सर्वां पर्यन्त पोहचवत आहे.

वडिलांच्या नोकरीमुळे तीचे बालपण व शालेय शिक्षण ग्रामीण भागातच झाले. अमरावती विद्यापीठाच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करत तीने आकुर्डी पुणे येथील डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक अभियांत्रिकी (M.E) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान तीने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला.  तिथेच तीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO),  युनायटेड नेशन्स सोबत कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.  तसेच सभोवताली दिसणारी परिस्थिती, माध्यमांमधून येणाऱ्या प्रदूषण, हवामान बदलांच्या बातम्या सातत्याने कानावर पडल्यामुळेच, सोनाली पर्यावरणाबद्दल संवेदनशील झाली.

तीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमधून पूर्ण केले आहे. UNICEF मधील अन्न आणि कृषी संस्थेसाठी तीने कार्य केले आहे. युनायटेड नेशनच्या विविध परिषदा आणि शिखर परिषदेसाठी तीची निवड झालेली आहे.  युनायटेड नेशन्सच्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्ससाठी निवडली गेली आणि युनाइटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज ची एक युवा मतदारसंघाची  सदस्य झाली. युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचा सदस्यही झाली आणि नुकतीच या परिषदेसाठी निवड झाली आहे.

राष्ट्रीय धोरणांच्या अंमलबजावणीची परिणामकारकता असावी. प्लॅस्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्य आणि समन्वय संशोधन आणि तंत्रज्ञानासंबंधी जागरूकता असणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कचरा निर्माण करणारे आणि पॅकेजिंगमध्ये गुंतलेले उद्योग आणि किरकोळ विक्रेते यांना ओळखले पाहिजे आणि कायदे केले पाहिजेत. जमिनीवरील महासागर आणि सागरी जीवसृष्टीबाबत शाश्वत विकासाचे उद्दिष्ट वेळेत साध्य केले जावे, ज्यामध्ये कोणत्याही भेदभावाची पर्वा न करता सर्व वयोगटातील लोकांचा सहभाग असावा, असे मत सोनाली झोळने आमच्याशी बोलताना व्यक्त केले.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा