घर Pimpri-Chinchwad उद्योगविश्वाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली “कमिटमेंट”

उद्योगविश्वाला नवी दिशा : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली “कमिटमेंट”

209
0

– उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक; आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
–  पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या मागण्यांना मिळणार न्याय

पिंपरी । प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसरातील लघुउद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत दिलेली ‘‘कमिटमेंट’’ राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पाळली असून, उद्या मंत्रालयात मॅरेथॉन बैठक होणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या मागणीनुसार ही बैठक होणार असून, शहराच्या उद्योग विश्वाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा उद्योगविश्वात व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी, विविध समस्या आणि मागणींबाबत पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठक घेऊन संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले होते.

दरम्यान, उद्योगमंत्री सामंत यांनी उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी उद्योगजक मेळाव्यालाही उपस्थिती लावली. यासह भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या सहयोगाने उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्याबाबत सर्वोतोपरी पुढाकार घेतला जाईल, असे आश्वासनही उद्योगमंत्र्यांनी दिले होते. विशेष म्हणजे, शहरातील उद्योजकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी शहराचा अवघ्या दीड महिन्यांत दोनदा दौरा आणि तात्काळ मंत्रालयात बैठक लावणारे उदय सामंत पहिले उद्योग मंत्री आहेत, अशा भावना लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केल्या.
पिंपरी-चिंचवड महानगर पालिका तसेच चाकण औद्योगिक परिसरातील लघु उद्योजकांना भेडसावणाऱ्या  समस्यांसदर्भात बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या मंत्रालयात आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मॅरेथॉन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस लघुउद्योजक संघटनांसह लघु उद्योजक सदर बैठकीस उपस्थित राहणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी “कमिटमेंट” पाळल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. उद्योगमंत्र्यांकडून संबंधित विभागाचे सचिव तसेच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना देण्यात येणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध समस्यांसंदर्भात चर्चा होणार आहे.

**
… या विषयांवर होणार निर्णय
1) भुयारी गटार योजना व सीइटीपी प्लांट, 2) खंडित वीज पुरवठा व वीज दरवाढ 3) एमएसईडीसीएलची सहा नवीन सबस्टेशन्स उभारणीबाबत 4) औद्योगिक परिसरातील कचरा समस्याबाबत 5) अग्निशमन केंद्र 6) वाहतूक व्यवस्था (बस सुविधा)7) वाढत्या अनाधिकृत झोपडपट्टी व वाढती अनधिकृत भंगार दुकाने
8) वाहतूक कोंडी 9) रेडझोन बाबत 10) शास्तीकर रद्द करणेबाबत 11) महाराष्ट्रात नवीन औद्योगिक गुंतवणूक वाढविणेबाबत 12) महापालिकेकडून देण्यात येणार्या अपुर्या सुविधेबाबत 13) लघुउद्योजकांना भूखंड उपलब्ध होणेबाबत 14) एक खिडकी योजना 15) सबसिडीबाबत 16) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र 17) औद्योगिक परिसरात होणार्या चोर्यांबाबत 18) ट्रक टर्मिनल जागेबाबत 19) वृक्ष लागवड व संवर्धनासाठी भूखंडबाबत 20) संघटना ऑफिस भूखंडाबाबतही उद्योग मंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली असून, उद्याच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा