घर Business सक्सेस मंत्रा : यशस्वी होण्यासाठी मुकेश अंबानींनी सांगितल्या ३ स्टेप्स

सक्सेस मंत्रा : यशस्वी होण्यासाठी मुकेश अंबानींनी सांगितल्या ३ स्टेप्स

135
0

दीक्षांत समारंभाला संबोधित करताना मुकेश अंबानींनी सांगितल्या ३ स्टेप्स

गांधीनगर:  अंबानींनी 4G आणि 5G च्या मागे धावणाऱ्या तरुणांना एक सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की “आपल्या देशातील तरुण 4G आणि 5G बद्दल खूप उत्सुक आहेत, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या जगात आई आणि वडिलांपेक्षा मोठा ‘G’ कोणी नाही. तरुणांनी आपल्या पालकांचा संघर्ष आणि त्याग विसरता कामा नये.”

यादरम्यान विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले की, “ज्या वर्षी भारताचा अमृत काल सुरू होणार आहे, त्या वर्षी ही बॅच पदवीधर होत आहे. आपल्या परंपरेत अमृत काल हे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी शुभ मानले जाते. अमृत कालमध्ये, भारताची अभूतपूर्व आर्थिक वाढ होईल आणि संधींचा पूर येईल. सध्या भारताची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर्सची आहे, जी २०४७ पर्यंत ४० ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल. अशा प्रकारे भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल. दीनदयाल ऊर्जा विद्यापीठाच्या १०व्या दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी यांनी तरुणांना यशस्वी होण्यासाठी तीन मंत्रही दिले.

१. मोठा विचार करा
आपल्या संबोधनात तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचा सल्ला अंबानींनी दिला. त्यांनी म्हटले की या जगात घडलेल्या सर्व महान गोष्टी एकेकाळी अशक्य वाटत होत्या. तुमचे स्वप्न कितीही कठीण असले तरी ते पूर्ण करण्यात धैर्याने आणि उत्साहाने काम करा. या एकमेव मार्गाने तुम्ही अशक्य गोष्ट शक्य करू शकता. तुम्ही तुमचे स्वप्न धैर्याने स्वीकारले पाहिजे, दृढ विश्वासाने जोपासा आणि धाडसी व शिस्तबद्ध कृतीने साकार केले पाहिजे.

२. थिंक ग्रीन म्हणजेच ग्रीन एनर्जीचा अवलंब करा
हरित ऊर्जा अंगीकारण्याचे आवाहन देखील अंबानी यांनी केले. मातृस्वभावाप्रती आपण संवेदनशील असायला हवे, असे त्यांनी सांगितले. आपल्याला असे ऊर्जेचे स्रोत शोधून त्याचा अवलंब करावा लागेल, ज्यातून आपण पर्यावरणाची हानी न करता प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो. आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण एक चांगला आणि निरोगी ग्रह सोडू याची आपल्याला खात्री करावी लागेल.

३. डिजिटल विचार करा म्हणजे डिजिटायझेशनला प्रोत्साहन द्या
अंबानी म्हणाले की, भारताला स्वच्छ ऊर्जेमध्ये अग्रेसर बनवण्याच्या मिशनमध्ये डिजिटायझेशन खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांनी म्हटले की AI, रोबोटिक्स आणि IoT सारखे तंत्रज्ञान क्रांतिकारी बदल घडवून आणू शकतात. त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा, हे तुम्हा सर्वांना शिकावे लागेल.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा