घर Pimpri-Chinchwad प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम या विषयावर कार्यशाळा आयोजित

प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम या विषयावर कार्यशाळा आयोजित

139
0
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागातर्फे चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम या विषयावरती वाणिज्य विभागातील वर्गांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी डॉ. रामदास लाड यांनी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीमचा उद्देश व महत्त्व सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या सिस्टीमचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठी कसा फायदा होतो हे स्पष्ट केले. तसेच बीकॉम या कोर्समध्ये विविध विषयांसाठी असणारे क्रेडिट आणि अतिरिक्त क्रेडिट यासंबंधीची सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. पद्मावती इंगोले यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. सुकेशनी जाधव आणि आभार डॉ. अर्चना माळी यांनी मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा